कोरोनाचे भविष्यातील दुष्परिणाम टाळण्यासाठी साधे सोपे उपाय!
कोरोनाची दुसरी लाट खूप भयानक असल्याचे चित्र आहे. आपल्या जवळचे, नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांना या आजाराची लागण झालेली आपण पहिले असेल. तेव्हा या आजाराचे होणारे भविष्यातील दुष्परिणाम व त्यांच्या वरील साधे सोपे उपाय याविषयी जाणून घेऊया...
● फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम : या विषाणूमुळे फुफ्फुसाला आतून जखमा झाल्यामुळे आणि त्या जखमा भरत असताना फुफ्फुसावर जे परिणाम होतात. यामुळे फुफ्फुसाची ऑक्सिजन शोषणाची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरातील/ रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. रुग्णास अशक्तपणा जाणवतो. रुग्ण सतत 6 मिनिटे पेक्षा अधिक काळ चालल्यास त्याला दम लागतो.
उपचार :
- आजारावरील उपचार झाल्यानंतर पुन्हा पुन्हा असा संसर्ग होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील राहणे ही आपल्या स्वतःची जबाबदारी आहे.
- हा आजार झाल्यानंतर फुफ्फुसाची शक्ती वाढविणे ही गरजेचे आहे. याकरीता रोज 10 ते 20 मिनिटे प्राणायाम करावा.
- यामध्ये अनुलोम विलोम, भास्रिका, पुरक - kumbhk- रेचक अशा स्वरूपाचा प्राणायाम आपण जरूर करावा.
यामुळे फुफ्फुसाच्या आतील कडकपणा कमी होऊन फुफ्फुसे लवचिक बनतात. जखमा भरून येतात.
- रक्तपुरवठा सुरळीत होतो व त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखले जाते.
- आणखी एक खूप महत्वाचा उपाय म्हणजे छाती व पाठ यास रोज आपल्या घरी उपलब्ध असलेल्या खोबऱ्याचे, तिळाचे तेल लावून मसाज करावा व नंतर कोमट पाण्याने स्नान करावे. यामुळे फुफ्फुसे बळकट होतात.
- फुफ्फुसाची शक्ती वाढविण्यासाठी व त्यावरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी खूप उपयोगी पडतात. तज्ञांच्या सल्याने जरूर काही दिवस औषधी घ्यावी.
● हृदयावरील दुष्परिणाम : या आजारामुळे क्वचित प्रसंगी हृदयाच्या पेशींना सूज येते. तसेच हृदयास रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये रक्त घट्ट झाल्यामुळे अडथळे येणे असे विकार होऊ शकतात.
उपचार :
- हे टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णाने पुढे काही महिने आयुर्वेदिक औषधी घेणे गरजेचे आहे. जसे - अडुळसा याचा काढा व चूर्ण.
- तज्ञांच्या सल्ल्याने अजून काही औषधी घेतल्यास रक्त वाहिन्यांचे आजार दूर होतात.
- त्या फुटून रक्तस्राव होत नाही. रक्त खूप घट्ट किंवा पातळ झाल्यामुळे उद्भवणारे आजारही होत नाहीत.
- तसेच अडुळसाच्या सेवनाने शरीरातील जीर्ण ज्वर कमी होऊन प्रतिकार शक्ती वाढते व खोकला कमी होऊन फुफ्फुसातील जंतू संसर्ग कमी होतो.
● मानसिक ताणतणाव : आपण सर्वांनी धीर धरून आपले मनोबल वाढवणे खूप गरजेचे आहे. काही रुग्णांमध्ये विविध मानसिक विकार पहावयास मिळतात. काहींना स्मृती भ्रंश झाल्याप्रमाणे वाटते.
उपचार :
- हे कमी करण्या करीता प्रत्येक रुग्णाने रोज ध्यान करणे फार आवश्यक आहे. यामुळे मनाची आणि मेंदूची शक्ती वाढते.
- शिरोधारा, नस्य या चिकित्सा पद्धतींचा अवलंब तसेच ब्राह्मी, अश्वगंधा अशा स्वरूपाची औषधी तज्ञांच्या सल्ल्याने जरूर घ्यावी. ही लक्षणे पूर्ण पणे कमी होतात.
- घरात नेहमी खेळी मेळीचे व प्रसन्न वातावरण ठेवावे. घर हवेशीर ठेवावे.
- अशा रुग्णांनी रात्री लवकर झोपावे व पूर्ण आठ तास झोप घ्यावी यामुळे शरीराला व मनाला बळ मिळते.
📍 थोडक्यात महत्वाचे :
- घसा स्वच्छ ठेवा त्यासाठी कोमट पाण्याने गुळण्या करा व वाफ घ्या.
- थोडासा व्यायाम करा.
- संतुलित, ताजा, सात्विक, स्वतः बनविलेला आहार घ्या.
- पुरेशी झोप व विश्रांती घ्या.
- सिगारेट, विडी, मद्य याचे व्यसन टाळा.
- रोज ध्यान करा.
- सकारात्मक अनुभव शेअर करा.
- सेल्फ हेल्प ग्रुप तयार करा.
- भावनिक आधार द्या व घ्या.
- सगळ्यात महत्वाचे तज्ञांच्या सल्ल्याने आयुर्वेद उपचार जरूर घ्या व निरोगी होण्या कडे पाऊल उचला.
👍 माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
अपने दोस्तों में लेख यह शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज संगीत जगत को लाइक करिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।